मुंबई – छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता आणि बिग बॉस १३ चे विजेते सिद्धार्थ शुक्ला आज हृदयविकाराचा झटका निधन झाले आहे.मुंबईतील कूपर रुग्णालयाने त्याला मृत घोषित केलं आहे.
View this post on Instagram
मिळलेल्या माहितीनुसार,अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने झोपण्याच्या काही तासापूर्वी औषधे घेतली होती, पण त्यानंतर तो उठू शकला नाही.
View this post on Instagram
सिद्धार्थचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे रुग्णालयाने पुष्टी केली आहे. त्याच्या निधनानंतर सर्वांनाच धक्का बसला असून चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक कलाकार सोशल मीडिया पोस्टद्वारे सिद्धार्थला श्रद्धांजली वाहत आहे.
View this post on Instagram
दरम्यान, कलर्स या हिंदी वाहिनीवरील बिग बॉस 13 या शोमध्ये सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल यांची जोडी चांगलीच गाजली होती.
View this post on Instagram
या शोमध्ये दोघे एकमेकांची काळजी घेताना दिसले होते. त्यांची केमिस्ट्री चांगलीच गाजली होती. शो संपल्यानंतरही चाहते या दोघांना एकत्र पाहू इच्छित होते.
View this post on Instagram
सिद्धार्थची शहनाज गिलसोबत खूप चांगली केमिस्ट्री रंगल्याचे पाहायला मिळाली.
View this post on Instagram
शहनाज तर सिद्धार्थच्या प्रेमात आकंत बुडाली होती.बिग बॉस शो संपल्यानंतर या दोघांना एकत्र अनेक प्रोजेक्ट ऑफर करण्यात आले होते.
View this post on Instagram
दोघांची मैत्री ‘बिग बॉस १३’ सिझनमध्येच झाली होती. दोघांच्या लग्नाच्याही बातम्या प्रचंड रंगल्या होत्या.
View this post on Instagram
टीव्ही इंडस्ट्री गाजवल्यानंतर बॉलिवूड सिनेमा ‘हंपटी शर्मा की दुल्हनिया’ आणि वेबसिरीज ‘ब्रोकन बट ब्यूटीफल’ हिट ठरली होती.