हा तर फक्त सराव होता, आता रियल होईल – नरेंद्र मोदी

नवी दिल्ली: पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतीय वायुसेना विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुटकेची घोषणा आज पाकिस्तान संसदेत केली. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. नरेंद्र मोदी म्हणाले,  “एक पायलट प्रकल्प पूर्ण झाला आहे. हा तर फक्त सराव होता आता रियल होईल”

काल भारत व पाकिस्तान यांच्यादरम्यान झालेल्या हवाई कारवाईमध्ये भारताने पाकिस्तानचे एक लढाऊ विमान पाडले होते. पाकिस्तानी विमानांना त्यांच्या हद्दीमध्ये पिटाळताना भारताचे लढाऊ विमान मिग २१ वैमानिकासह बेपत्ता झाले होते. यानंतर भारताचे हे विमान पाकिस्तानच्या हद्दीत कोसळल्यानंतर पाकिस्तानने अभिनंदन नामक भारतीय वैमानिकाला आपल्या ताब्यात घेतले होते. दरम्यान पाकिस्ताननी पंतप्रधानांनी आज पाकिस्तानच्या संसदेमध्ये आपण भारतीय वैमानिकाला भारताकडे सुपूर्द करणार असल्याची माहिती दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.