हा ‘चहावाला’ तुमचं आयुष्य सुधारण्यासाठी आहोरात्र झटतोय – पंतप्रधानांचे आसाममध्ये प्रतिपादन

आसाम : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आसाम येथील सिलचर येथे एका जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी बोलताना पंतप्रधानांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी तथा काँग्रेस पक्षाद्वारे घेण्यात आलेल्या निर्णयांचा खरपूस समाचार घेतला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना देशामध्ये पुन्हा एकदा भाजप सरकार स्थापन करेल असा विश्वास दर्शवत ते म्हणाले, “तुम्ही दाखवत असलेल्या उत्साहामुळे देशातील आगामी लोकसभा निवडणुकांमधील ‘हवेचा’ अंदाज सहज बांधता येत आहे.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणाऱ्या तरुणांना कानमंत्र देताना म्हंटले की, “काँग्रेसच्या इतिहासामध्ये झाकून बघा, काँग्रेस हा नेहमीच समस्या उत्पन्न करणारा पक्ष ठरला आहे. १९४७मध्ये जेव्हा धार्मिक आधारावर भारत-पाकिस्तान फाळणी झाली, तेव्हा पाकिस्तानातील धार्मिक अल्पसंख्यांकांचा विचार काँग्रेसने केला नाही.”

यावेळी मोदींनी काँग्रेस अध्यक्षांना उद्देशून तिरकस टीका करताना, “सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यांना केवळ चहाचा स्वाद घेण्याची माहिती असते मात्र त्यांना चहाची पाने तोडताना हाताला होणाऱ्या जखमांची मात्र कल्पना देखील नसते. हा चहावाला तुमचं आयुष्य सुधारण्यासाठी आहोरात्र कष्ट घेत आहे.” असे वक्तव्य केलं.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.