तज्ञांना महत्व देण्याऐवजी नाट्यमय धोरणे आखल्यामुळे ही स्थिती; रामचंद्र गुहा यांची मोदींवर टीका

नवी दिल्ली – करोना परिस्थिती हाताळण्यात भारताला आलेल्या अपयशासाठी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाची शैलीच मुख्यपणे कारणीभूत असल्याचे इतिहास आणि राजकीय क्षेत्राचे जाणाकार रामचंद्र यांनी म्हटले आहे. करोना स्थिती अयोग्यपणे हाताळल्याबद्दल त्यांनी मोदींवर टीकाही यावेळी केली.
गुहा यांनी एका मुलाखतीमध्ये मोदींच्या मंत्रिमंडळालाही यावेळी दोष दिला.

मोदींच्या आजूबाजूला असणारे त्यांच्या होमध्ये हो मिळवणारे अधिकारी, भारतीयांना निराश करणारे सर्वोच्च न्यायालयही जबाबदार असल्याचे गुहांनी म्हटले आहे. मात्र या साऱ्या गोंधळासाठी मोदींनाच जबाबदार धरावे लागणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

तज्ज्ञ आणि तज्ज्ञांच्या ज्ञानाचा अवामान. तज्ज्ञांच्या शिक्षणाला फारसा मान न देण्याची वृत्ती मोदींची आहे. हार्वर्डपेक्षा हार्ड वर्कला आपण प्राधान्य देतो या मोदींच्या वक्तव्यावरुन त्यांचे शिक्षणाबद्दलचे प्रेम दिसून येते,असा टोलाही गुहा यांनी या मुलाखतीमध्ये लगावला आहे.

मला तज्ज्ञांची गरज नाही असं मोदींच म्हणाले होते. आपल्याला तज्ज्ञांपेक्षा जास्त कळते असे त्यांना वाटते. ते फक्त अशाच तज्ज्ञांचा सल्ला घेतात जे त्यांना अपेक्षित उत्तर देतात, असे सांगतानाच याच गोष्टींचा संबंध गुहा यांनी करोना परिस्थितीशी जोडला आहे. करोना परिस्थिती हाताळताना मोदींनी तज्ज्ञांना प्राधान्य देण्याऐवजी नाट्यमय धोरणं आखण्याला प्राधान्य दिल्याचे गुहा म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.