उद्यापासून ‘या’ नियमांमध्ये होणार मोठा बदल 

नवी दिल्ली – दैनंदिन जीवनातील अनेक नियम १ ऑक्टोबर म्हणजेच मंगळवारपासून बदलणार आहेत. ड्रायव्हिंग लायन्सस, आरबीआय, पेट्रोल-डिझेल संबंधित अनेक नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत.

या’ नियमांमध्ये होणार बदल 
– १ ऑक्टोबरपासून म्हणजेच उद्यापासून वाहन परवाना बनविण्याचे नियम बदलणार आहेत. तसेच तुम्हाला जुना वाहन परवानाही अपडेट करावा लागणार आहे. ही प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन असणार आहे. या नियमानुसार, वाहन परवाना आणि नोंदणी प्रमाणपत्र (रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट) एकाच रंगाचे होतील. याशिवाय वाहन परवाना आणि आरसी बुकमध्ये मायक्रो चिपसोबतच क्युअर कोडही दिले जाईल.

– स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय)मध्ये उद्यापासून खात्यात अॅव्हरेज बॅलन्स न ठेवल्यास होणाऱ्या दंडाच्या रकमेत ८० टक्क्यांनी कपात होणार आहे. जर तुमचे खाते मेट्रो सिटीमध्ये आहे तर तुमचा बॅलन्स कमीत-कमी ३ हजार रुपये असला पाहिजे. ही रक्कम खात्यात न ठेवल्यास खातेधारकाला ८० रुपयांसमवेत जीएसटीची रक्कम दंड म्हणून भरावी लागेल.
एसबीआय मेट्रो सिटीला १० तर अन्य शहरांना १२ फ्री ट्रान्झक्शन देणार आहे.

– तसेच पेट्रोल-डिझेल खरेदी केल्यास उद्यापासून कॅशबॅक मिळणार नाही.

– उद्यापासून नवीन जीएसटी दर लागू होणार आहेत. यानुसार १००० रुपयांपर्यंत भाड्याच्या खोल्यांवर यापुढे कर आकारला जाणार नाही.

– १२-१३ आसनाच्या पेट्रोल आणि डिझेल वाहनांवरील कर १० ते १३ टक्क्यांनी कमी करण्यात येणार आहे. तर प्रवासी रेल्वे आणि वॅगन्सवरील जीएसटीचा दर ५ ते १२ टक्के असेल. कॉफीसारख्या उत्पादनांवरील १२ टक्क्यांसह अतिरिक्त 28 टक्के सेस असेल.

– सरकारी कर्मचार्‍यांचे निवृत्ती वेतन धोरणातही बदल होणार आहे. एखाद्या कर्मचार्‍याच्या सेवेला ७ वर्षे पूर्ण झाली आहेत आणि जर त्याचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबास वाढीव पेन्शनचा लाभ मिळेल.

– कॉर्पोरेट करातही उद्यापासून कपात लागू केली जाईल. कॉर्पोरेट टॅक्स हा सरकारने ३० टक्क्यांवरून २२ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. 1 ऑक्टोबरनंतर स्थापन झालेल्या मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांना १५ टक्के कर भरण्याचा पर्यायही असेल.

– २ ऑक्टोबरपासून देशभरात सिंगल युज प्लास्टिकवर पूर्णतः बंदी लागू होणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.