“ऍनिमल’मध्ये परिणिती साकारणार ही भूमिका

बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या आपल्या आगामी अनेक प्रोजेक्‍टमध्ये व्यस्त आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी रणबीरने आपल्या “ऍनिमल’ चित्रपटाचीही घोषणा केली होती. या चित्रपटात रणबीर कपूरसह अनिल कपूर, परिणिती चोप्रा आणि बॉबी देओल मुख्य भूमिका साकारणार आहेत. हा एक गॅंगस्टार ड्रामा चित्रपट आहे.

 संदीप रेड्डी वांगा हे दिग्दर्शित करत असलेल्या “ऍनिमल’मध्ये परिणिती चोप्रा ही रणबीर कपूरच्या पत्नीची भूमिका साकारणार असल्याचे समजते. तसेच अनिल कपूर हे वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे. यामुळे रणबीर कपूर आणि परिणिती चोप्रा यांची जोडी पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांमधील उत्सुकता वाढली आहे. वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास रणबीर कपूर आपल्या बहुप्रतीक्षित “ब्रह्मास्त्र’ चित्रपटामुळे सतत चर्चेत असतो. यात रणबीरसह त्याची गर्लफ्रेंड आलिया भट्टने नायिका म्हणून काम केले आहे. लॉकडाऊनमुळे या चित्रपटाची रिलीज डेट अनेकवेळा लांबणीवर टाकण्यात आली आहे. 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.