नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर राज्यात मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात करण्यात आले आहे. हिंसाचाराच्या घटना होऊ नये म्हणून सुरक्षा यंत्रणा चोख ठेवण्यात आली आहे. तसेच जमावबंदीचे 144 कलम लावण्यात आहे. त्यामुळे एकूणच राज्यात तणावपुर्ण शांतता असल्याचे पहायला मिळत आहे. रस्तावर कोणतीही वर्दळ नाही. त्यातच सध्या जम्मू काश्मीरमधील एक फोटो सोशलमीडियावर व्हायरल होत आहे.
आज के दिन की सबसे खूबसूरत तस्वीर।
इन मिलते हाथों में है ‘मुस्कुराहट, और विश्वास’ का अटूट संगम है।#JammuKashmir@crpfindia https://t.co/xhGClv17f0
— Bhupendra Singh Chaudhary (@Bhupendraupbjp) August 8, 2019
एक चिमुकला एका महिला सुरक्षारक्षकाच्या हातात हात देत असल्याचा हा फोटो आहे. राज्यातील परिस्थिती लवकर पुर्ववत व्हावी किंवा त्यासाठी तुम्हीदेखील प्रयत्न करा असे सांगणारा हा फोटो असल्याचे बोलले जात आहे. तसेच हा फोटो खोऱ्यात स्थैर्य आणि शांतीचे प्रतिक असल्याचेही म्हटले आहे. दरम्यान, दुरदर्शन आणि प्रसार भारतीने हा फोटो प्रसारित करून हा विश्वास आणि हास्याचे संगम असल्याचे म्हटले आहे.