‘या’ फोटोने आनंद महिंद्रांना केले प्रभावित; दिला खास संदेश 

नवरात्रीनिमित्त सोशल मीडियावर सध्या अनेक देवींची रूपे व्हायरल होत आहेत. असाच एक फोटो व्यावसायिक आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. हा फोटो कोणत्याही देवीचा नसून मुलांनी साकारलेल्या देवीच्या रूपातील आहे.

या फोटोतील मुले एका सरकारी शाळेतील विद्यार्थी असून त्यांनी महिषासुरमर्दिनी दुर्गामातेचे रूप साकारले आहे. आनंद महिंद्रा यांनी फोटो शेअर करताना म्हंटले कि, हे रूप मी बघितलेल्या सर्व रूपांपेक्षा फारच सुंदर आहे. जेव्हाही मानवतेच्या भावनांची गोष्ट येते तेव्हा लहान मुले नेहमी बाजी मारतात, अशी कॅप्शन त्यांनी दिली आहे.

दरम्यान, आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेला फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.