बॅालीवूड इंडस्ट्रीमधील धक धक गर्ल म्हणून माधुरी दीक्षितची ओळख आहे. मकर संक्रातीच्या एक दिवस अगोदर माधुरीने नवी कार विकत घेतली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच रणबीर कपूर, शिल्पा शेट्टी आणि श्रद्धा कपूरनंतर आता माधुरीनेही आलिशान कार खरेदी केली आहे. मकरसंक्रातीचा शुभ मुहर्त साधत आदल्या दिवशी तिने पती डॅा. श्रीराम नेने यांच्याबरोबर नवी कार खरेदी केली आहे. या कारची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल.
मिळालेल्या माहितीनुसार, माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांनी फेरारी 296 GTS ही महागडी कार खरेदी केली आहे, ज्याची किंमत 6 कोटींहून अधिक आहे. 13 जानेवारीला मुंबईत हे कपल लाल रंगाच्या फेरारीमध्ये दिसले. त्यांनी कार खरेदी केल्याचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरून व्हायरल होत आहे. ज्यामध्ये डॅा. नेने आणि माधुरी यांची स्वीट कपलची जोडी दिसत आहे. माधुरीने चमकदार गाऊन घातला आहे, तर तिच्या पतीने काळ्या रंगाचा सूट घातला आहे. माधुरीकडे Mercedes Maybach S560 ही कार देखील आहे, ज्याची किंमत सुमारे 2.5 कोटी रुपये इतकी आहे.
मीडिया रिपोर्टने दिलेल्या माहितीनुसार, तिच्याकडे Mercedes S-Class 450 (रु. 1.3 कोटी), Skoda Octavia vRS (रु. 26.29 लाख), Innova Crysta (9.5 लाख रुपये), Range Rover Vogue (सुमारे 3 कोटी रुपये), Mercedes GLS 350d (रु. रेंज रोव्हर स्पोर्ट्स (रु. 88 लाख) आणि रेंज रोव्हर स्पोर्ट्स (रु. 91 लाख ते 2.1 कोटी) देखील आहेत. आता माधुरीकडेै ६ कोटीहून अधिक किमंत असलेली कार शामिल झाली आहे.