मुंबई- बॉलिवूडच्या अनेक दिग्ज कलाकारांना आपण हॉलिवूडच्या पडद्यावर आपल्या अभिनयाचे धडे गिरवताना पाहिलं आहे. मात्र, आता आनंदाची बाब म्हणजे आपल्या मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार देखील हॉलिवूडपटांमध्ये झळकणार आहे.
लेखक आणि दिग्दर्शक डॉ. रवि गोडसे यांचा ‘रिमेंबर अमेझिया’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, या चित्रपटात मराठी अभिनेत्री ‘श्रुती मराठे’ मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. श्रुतीसह यामध्ये अनेक मराठी दिग्ज कलाकार सुद्धा प्रेक्षकांना दिसून येणार आहे.
महेश मांजरेकर, विजय पाटकर, जयवंत पाटेकर, आनंद काळे आणि मेधा मांजरेकर ही कलाकार मंडळी आपल्याला दिसणार आहेत. ‘रिमेंबर अमेझिया’ येत्या नोव्हेंबरमध्ये जगभरात प्रदर्शित होणार आहे.
View this post on Instagram