साऊथचे सुपरस्टार चिरंजीवी यांचा ‘सेरा नरसिम्हा रेड्डी’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवत आहे. या चित्रपटात तमन्ना भाटियाही मुख्य भूमिकेत झळकली आहे. या चित्रपटातील तमन्नाचा अभिनय चिरंजीवींच्या सुनेला एवढा भावला कि तिने तमन्नाला जगातील सगळ्यात महागडा आणि किमती हिऱ्यापैकी एक हिरा भेट म्हणून दिला. हा ब्लॅक हिऱ्याचा नंबर जगातील सर्वात मोठ्या हिऱ्यांपैकी पाचवा आहे. तर या हिऱ्याची किंमत जवळपास २ कोटी रुपये आहे.
A gift for the super @tamannaahspeaks
from Mrs Producer ?❤️?
Missing u already. Catch up soon. #SyeraaNarashimaReddy pic.twitter.com/rmVmdwWNAd— Upasana Konidela (@upasanakonidela) October 3, 2019
‘सेरा नरसिम्हा रेड्डी’ चित्रपटात तमन्ना लक्ष्मी हे पात्र साकारत आहे. हा चित्रपट २ ऑक्टोबर रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. चिरंजीवी यांनीही तमन्नाच्या अभियानाचे कौतुक केले. तर चिरंजीवी यांचा मुलगा रामचरणची पत्नी उपासना कोनीडेलाने तमन्नाला ब्लॅक हिरा भेट म्हणून दिला.
दरम्यान, ‘सेरा नरसिम्हा रेड्डी’ चित्रपटाचं बजेटही २७० कोटीच्या आसपास आहे. यामध्ये भरपूर स्पेशल इफेक्ट्स, तंत्रज्ञान आणि व्हिएफएक्सचा वापर करण्यात आला आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटीशांविरुध्द एल्गार पुकारणााऱ्या स्वातंत्र्य सैनिकाची ही सत्यकथा आहे. या चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन, चिरंजीवी यांच्यासोबत तगडी स्टारकास्ट आहे. सुरेंद्र रेड्डी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून राम चरण या चित्रपटाचा निर्माता आहे.