काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधी यांनी आपल्या भगिनी प्रियांका गांधी वढेरा यांच्यासोबत वायनाड येथे जोरदार शक्तिप्रदर्शन देखील केले यावेळी केरळ काँग्रेसचे अनेक स्थानिक नेते देखील उपस्थित होते.
Rahul Gandhi in Wayanad: I have come to Kerala to send a message that India is one, be it North,South,East or West. My aim is to send a message, there is a feeling in South India that the way Centre,Modi ji and RSS are working its like an assault on culture and languages in South pic.twitter.com/QTOjcavP3i
— ANI (@ANI) April 4, 2019
दरम्यान राहुल गांधी यांनी आज आपण केरळमधून लोकसभा निवडणूक लढण्या मागचे कारण देखील स्पष्ट केले असून ते म्हणतात, “मी केरळ मधून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे कारण मला संपूर्ण भारत हा एक असल्याचा संदेश द्यायचा आहे. केंद्रातील भाजप सरकार व आरएसएस यांच्या दक्षिण व्देशी कृतीमुळे येथील जनतेच्या मनात आपल्या संस्कृतीवर हल्ला झाल्याची भावना आहे.” यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी त्यांच्या केरळमधून निवडणूक लढविण्याचा निर्णयाला विरोध दर्शविणाऱ्या डाव्या पक्षांबाबत देखील वक्तव्य केलं आहे. ते म्हणतात, “डाव्या पक्षांमधील माझे काही बंधू आणि भगिनी माझ्या केरळमधून निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर नाराज झाले आहेत. त्यांच्याद्वारे माझ्यावर टीका देखील करण्यात येत आहे मात्र मी डाव्या पक्षातील कोणत्याही नेत्यावर निवडणुकांच्या प्रचारादरम्यान टीका करणार नाही.”