इसिसमुळे प्रेरित झालेल्या गटाच्या आणखी एका सदस्याला अटक

नवी दिल्ली – इसिसमुळे प्रेरित झालेल्या गटाच्या आणखी एका सदस्याला शनिवारी देशाची राजधानी दिल्लीत अटक करण्यात आली. मोहम्मद गुफरान असे त्याचे नाव आहे. तो उत्तरप्रदेशच्या अमरोहाचा रहिवासी आहे. इसिसमुळे प्रेरित होऊन हकरत उल्‌ हर्ब-ए-इस्लाम या गटाची स्थापना करण्यात आल्याचे काही दिवसांपूर्वी उघड झाले. त्या गटाने राजकारण्यांबरोबरच सरकारी आस्थापनांना लक्ष्य करून आत्मघाती हल्ले तसेच साखळी बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचल्याची माहितीही पुढे आली. त्या गटाशी संबंधित 12 जणांना याआधी अटक करण्यात यश आले. आता गुफरानच्या रूपाने त्या गटाच्या 13 व्या सदस्याला अटक झाली आहे. आपल्या गटासाठी शस्त्रास्त्रे आणि स्फोटके मिळवण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आल्याचे निष्पन्न झाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.