‘ये जो देश है तेरा, स्वदेस है तेरा…’; अमेरिका नौदलाच्या कर्मचाऱ्यांनी गायले गाणे

नवी दिल्ली – अभिनेता शाहरुख खान याचा २००४ साली ‘स्वदेश’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटासोबत यातील गाण्यांनाही चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. यातील टायटल ट्रॅक ‘ये जो देश है तेरा’ या गाण्याला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळली होती. हेच गाणे आता अमेरिकेच्या नौदलाच्या काही कर्मचाऱ्यांनी गेले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

एका भोजन कार्यक्रमादरम्यान २७ मार्च रोजी हे गाणे नौदलाच्या कर्मचाऱ्यांनी सादर केले. या कार्यक्रमादरम्यान अमेरिकेचे चीफ ऑफ नेव्हल ऑपरेशन्स मायकल एम गिल्डे आणि भारताचे राजदूत तरनजीत सिंग संधू उपस्थित होते. यावेळचा व्हिडीओ तरनजीत सिंग संधू यांनी आपल्या ट्विटर आकाऊंवर शेअर केला आहे. दरम्यान, सोशल मीडियावरील आता हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.