पवारांचं असं झालंय ,’सौ चुहे खाके बिल्ली हज को चली’

मुंबई – पंढरपूर पोट निवडणूकीवरून सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. दोन दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंढरपूरात सभा घेतली. त्यानंतर आज माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेऊन सरकारवर टीका केली.

‘सरकार कधी बदलायचंय ते माझ्यावर सोडा, ते आपण बदलू. पण या सरकारला त्यांची जागा दाखवून देण्याची पहिली संधी मंगळवेढ्याच्या मतदारांना मिळाली आहे,’ असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यावर   अजित पवार यांनी  ‘सरकार बदलणे म्हणजे येडय़ा गबाळ्या काम नाहीच.’ असं म्हणत भाजपवर खोचक टीका केली. यावर आता भाजप नेते  चंद्रकांत पाटील यांनी वृत्तमाध्यमांशी बोलतांना प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील

अजित पवारांच अलीकडच्या काळात ते जोरात आहेत. हिंदीमध्ये म्हण आहे की सौ चुहे खाके बिल्ली हज को चली,  राजकीयदृष्ट्या फार महत्व नसलेल्या लोकांच्या घरी जावं लागतं. हा त्यांचा स्वभाव नाही, तो शरद पवारांचा स्वभाव आहे. निवडणूक त्यांच्या हातून गेल्याचं हे लक्षण आहे. ज्याप्रकारे ते बोलत आहेत त्यावरुन पायाखालची जमीन सरकली आहे असं दिसत आहे. पायाखालची जमीन सरकली ही जिभेवरचा ताबा सुटतो. त्यामुळे पंढरपूर-मंगळवेढ्याची निवडणूक भाजपा जिंकणार हे स्पष्ट आहे.” असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.