‘हे’ आहेत जगातील सर्वात तरुण राष्ट्रप्रमुख

मुंबई – फिनलंडच्या पंतप्रधान म्हणून साना मरिन यांनी मंगळवार दि. 8 डिसेंबर रोजी शपथ घेतली आणि एखाद्या राष्ट्राच्या पंतप्रधानपदी सर्वात कमी वय असल्याचा विक्रमही त्यांनी प्रस्थापित केला. दि. 16 नोव्हेंबर 1985 जन्मलेल्या साना मरिन यांनी 34 वर्षे, 24 दिवस इतके वय असताना फिनलंडच्या पंतप्रधानपदी विराजमान होत, एक तरुण महिला आता या विकसित देशाचे नेतृत्त्व करणार आहे. त्याबद्दल जगभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे. राजकारणात चाळीशी पार होण्याआधी राष्ट्रप्रमुख बनण्याला एक आगळेवेगळे महत्त्व आहे. अशाच काही तरुण राष्ट्रप्रमुखांची ही अल्पशी ओळख…

यापूर्वी हा मान युक्रेनचे पंतप्रधान ओलेक्‍सी होनारुक यांनी मिळवला होता. याच वर्षी आपल्या वयाची 35 वर्षे, 156 दिवस पूर्ण करत 7 जुलै 1984 रोजी जन्मलेल्या होनारुक यांनी हे सर्वोच्च पद मिळवले होते. तर दि. 8 जानेवारी 1983 जन्मलेले उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग-उन यांनी 36 वर्षे, 336 दिवस पूर्ण असताना उत्तर कोरियाच्या राष्ट्रप्रमुखपदावर आपला दावा सांगितला होता. त्यांच्या राजवटीबद्दल अनेक वाद असून एकविसाव्या शतकातले हुकूमशहा अशी त्यांची ओळख बनली आहे. लॅटिन अमेरिकेतील अल साल्वाडोरचे अध्यक्ष म्हणून नायब बुकेले जून 2019 पासून विराजमान आहेत. त्यांचा जन्म 24 जुलै 1981 चा असून वयाची 38 वर्षे, 139 दिवस पूर्ण झाली असता, त्यांनी अल साल्वाडोरची सूत्रे हाती घेतली.

दि. 26 जुलै 1980 ला जन्मलेल्या जॅकिंडा आर्डर्न यांनी 39 वर्षे, 137 दिवस झाले असताना न्यूझीलंडच्या पंतप्रधानपदाची शपथ वर्ष 2017 मध्ये घेतली होती. हैतीचे पंतप्रधान म्हणून फ्रिट्‌ज-विल्यम मिशेल यांनीही वर्ष 2019 पासून आपला कार्यभार सांभाळला. त्यांचा जन्म 23 जुलै 1980 चा असून पंतप्रधान बनताना त्याम्चे वय 39 वर्षे, 140 दिवस होते.
त्याचबरोबर कतारचे तमीम बिन हमद अल थानी अमीर हे 2013 पासून (39 वर्षे, 190 दिवस) तर भूतानचे राजे राजाजिग्मे खेसर नामग्येल वांगचुक (2006 पासून) (39 वर्षे, 292 दिवस) आणि कोस्टा रिकाचे अध्यक्ष म्हणून कार्लोस अल्वाराडो क्विसाडा हश 2018 पासून (39 वर्षे, 330 दिवस) तसेच अँडोरा सरकारचे प्रमुख म्हणून झेविअर एस्पॉट झमोरा (40 वर्षे, 41 दिवस) हे वर्ष 2019 पासून सर्वोच्च पदावर विराजमान आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)