-->

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेचा पुण्यात असाही परिणाम

तेरा लाखांच्या तपासणीतून दीड हजारांवर बाधित सापडले

करोना पॉझिटिव्ह आढळण्याचे प्रमाण 14 टक्के

पुणेकरोना रोखण्यासाठीमाझे कुटुंब, माझी जबाबदारीमोहीम सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत पुणे, पिंपरीचिंचवड शहर आणि ग्रामीण भागातील प्रत्येक घरी जाऊन घरातील व्यक्तींची तपासणी केली जात आहे. त्यात आतापर्यंत 12 लाख 70 हजार नागरिकांची तपासणी केली असता, यामध्ये 11 हजार 500 संशयितांपैकी 1 हजार 563 नागरिकांना करोनाची लागण झाल्याचे दिसून आले. यामध्ये करोना पॉझिटिव्ह आढळण्याचे प्रमाण 14 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.


विभागीय आयुक्त राव यांनी पत्रकरांशी ऑनलाइन संवाद साधला. यावेळी महापालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख उपस्थित होते. महापालिकेतील कर्मचारी, ग्रामीण भागात ग्रामपंचायतीचे कर्मचारी आरोग्य सेवक, शिक्षक यांच्या मदतीने ही मोहीम घरोघरी राबवली जात आहे.

 

हे कर्मचारी घरी जाऊन व्यक्तींची थर्मोमीटरद्वारे शरीराचे तापमान आणि ऑक्सिमीटरद्वारे शरीरातील ऑस्किजनची पातळीची माहिती घेतात. त्याचबरोबर घरातील व्यक्तींना खोकला, ताप अशी करोनाचे लक्षणे आहेत का, याची माहिती घेऊन त्याची नोंद करतात. जिल्ह्यातील 1 कोटी 10 लाख नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे, असे राव यांनी सांगितले.


ही मोहीम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी, एनसीसीचे विद्यार्थी यांचीही मदत घेतली जात आहे. करोना नियंत्रणासाठी समितीची स्थापना करण्यात आली असून, यामध्ये 6 शासकीय, तर 6 अशासकीय सदस्यांची नियुक्ती केली आहे. ही समिती करोना नियंत्रणासाठी काय उपाययोजना करायच्या, याचा आराखडा करणार आहे, असे राव म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.