डॉक्टरांनी ‘बिग बी’ला दिला हा सल्ला

मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीत ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या बॉलिवूडमधील करिअरला नुकतेच 50 वर्षे पूर्ण झाली. भारतीय चित्रपटसृष्टीच्या यश अपयशाचे अमिताभ बच्चन हे साक्षीदार आहेत.

‘कुली’ चित्रपटाच्यावेळी मृत्यूच्या दाढेतून बच्चन परत आले, त्यानंतर तब्येतीची अनेक दुखणी असतानाही आजही ते अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच सोशल माध्यमातून ते अनेकदा त्यांचे विचार आणि इतर अनेक गोष्टींबद्दल लिहित असतात. यातच नुकत्याच केलेल्या एका ट्वीटमध्ये त्यांनी त्याच्या हेल्थ संबंधीत काही अपडेट्स शेअर केले आहेत, ज्यात त्यांनी सांगितलं की डॉक्टरांनी त्यांना काही काळासाठी कामातून ब्रेक घेण्याचा सल्ला दिला आहे.

तत्पूर्वी, 2012 मध्ये शस्त्रक्रियेसाठी अमिताभ तब्बल 12 दिवस रुग्णालयात होते. अमिताभ यांना यकृताची समस्या असल्यामुळे त्यांना वेळोवळी तपासणीसाठी रुग्णालयात जावे लागते. दरम्यान, वयाच्या 77 व्या वर्षी बच्चन त्याच पूर्वीच्या उमेदीने झोकून काम करत आहेत. आगामी काळात त्यांचे ‘झुंड’, ‘गुलाबो सिताबो’, ‘ब्रह्मास्त्र’सारखे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)