मुंबई – उर्मिला मातोंडकरने मांडलेल्या थेट मतावर कंगना रणौतने अत्यंत खालच्या पातळीवरची टीका करत ‘सॉफ्ट पॉर्न स्टार’ म्हंटले आहे. कंगनाच्या टीकेनंतर उर्मिलाला सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत अनेक नेटकऱ्यांनी उर्मिला यांची बाजू घेतली. सध्या सोशल मीडियावर उर्मिला मातोंडकर आणि कंगना रणौत या दोन अभिनेत्रींमध्ये ट्विटर वॉर सुरु आहे. यादरम्यान या पाठिंब्या दिलेल्या अनेक नेटकऱ्यांचे उर्मिलाने आभार मानले आहेत.
Thank you the “Real People of India” and a rare breed of unbiased,dignified media for standing by me. It’s Your victory over fake IT trolls n propaganda.
Deeply touched..humbled 🙏🏼#JaiHind— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) September 18, 2020
उर्मिला म्हणाली,’“मला पाठिंबा दिल्याबद्दल निष्पक्ष माध्यमं आणि इतर सर्वांचे मनापासून आभार. सर्वसाधारणपणे भारतात विरोधी पक्षाची बाजू फारसं कोणी घेत नाही. त्यामुळे हा दुर्मिळ योग आहे. खोट्या प्रचार करण्यांविरोधात हा आपला विजय आहे.” अशा आशयाचं ट्विट करुन उर्मिला मातोंडकर यांनी पाठिंबा देणाऱ्या सर्व मंडळींचे आभार मानले आहेत. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.’