ही वेळ निवडणूक नव्हे तर करोनाशी लढण्याची

बिहारमध्ये परतणाऱ्यांचे हाल पाहून प्रशांत किशोर संतप्त

नवी दिल्ली – देशव्यापी लॉकडाऊनमुळे मोठ्या संख्येने बिहारी इतर राज्यांमधून आपापल्या घरी परतण्यासाठी धडपडत आहेत. त्यातील अनेकांचे बिहारमध्ये परतूनही मोठे हाल होत आहेत. ते पाहून निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर संतप्त झाले. प्रशांत किशोर यांनी मुख्यमंत्री नीतीश कुमार यांचावर ट्विट करत  सल्लाही दिला आहे.

प्रशांत किशोर  ट्विट केले आहे की,’देशातील इतर राज्यांसह बिहारमध्येही करोना बाधितांची स्थिति चिंताजनक आहे. असे असतांना देखील सरकारी यंत्रणेचा एक वर्ग येत्या निवडणुकांच्या तयारीला लागला आहे. नीतीश कुमारजी ही वेळ निवडणूक लढविण्याची नव्हे तर करोनाशी लढण्याची आहे. निवडणूका घेण्याच्या घाईत  जनसामान्यांचे जीवन घोक्यात टाकू नका.’ प्रशांत किशोर यांनी ट्विट करत असा सल्लाही दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.