नवी दिल्ली – भारतीय जनता पार्टीचे राज्यसभा सदस्य सुब्रमण्यम स्वामी यांनी सध्या स्वपक्षाच्या आयटी सेलविरोधात बंड पुकारले आहे. यासाठी स्वामींनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना अल्टिमेटमही दिला आहे. या पार्श्वभूमीवर स्वामी यांच्यावर सोशल हल्ले करणाऱ्याविषयी एका व्यक्तीने ट्विट केले होते. यावर स्वामी यांनी सोशल हल्ले करणाऱ्या व्यक्तीविषयी गौप्यस्फोट केला आहे.
सुब्रमण्यम स्वामी म्हणाले कि, हाच तो दाऊदचा उजवा हात आणि शरद पवार यांचा चेला आहे, ज्याला त्यांनी माझ्या २जी प्रकरणानंतर नाकारले, असे ट्विट त्यांनी केले आहे. मात्र, या ट्विटनंतर ही व्यक्ती कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
That is Dawood’s right hand man and Sharad Pawar’s chela who however disowned him after my 2G case. https://t.co/UpvC2IluL6
— Subramanian Swamy (@Swamy39) September 10, 2020
दरम्यान, भाजपचा आयटी सेल माझ्यावर व्यक्तिगत हल्ला आणि टीका करतो आहे. त्याकरता पक्षाला जबाबदार धरले जाऊ शकत नाही. त्याचप्रमाणे जर माझ्या समर्थकांनीही व्यक्तिगत हल्ला सुरू केला तर मलाही जबाबदार धरले जाऊ शकत नाही, असे सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले होते. तसेच भाजपचे आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांना 24 तासांच्या आत पदावरून हटवण्यात यावे. अन्यथा स्वत:चा बचाव करण्यासाठी मला प्रत्युत्तर द्यावे लागेल, असा इशाराच त्यांनी जे. पी. नड्डा यांना दिला होता.