नवी दिल्ली : लखीमपूर खेरीमध्ये शेतकरी आंदोलनाच्या दरम्यान घडलेल्या घटनेचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये एक जीप मागून शेतकऱ्यांना चिरडताना दिसत आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधी नेत्यांनी भाजपवर जोरदार हल्ला केला आहे. काँग्रेस आणि आपचे खासदार संजय सिंह यांच्यासह सर्व नेत्यांनी व्हिडिओ शेअर केला आहे. तरीही मात्र याबाबत अधिकृतपणे पोलीस किंवा प्रशासनाकडून माहिती देण्यात आलेली नाही.
व्हिडिओमध्ये दिसत आहे की मोठ्या संख्येने शेतकरी हातात झेंडे घेऊन रस्त्यावर आंदोलन करत आहेत. दरम्यान, हूटर वाजवत असताना मागून येणाऱ्या जीपने अनेकांना चिरडले. जीपच्या मागे एक एसयूव्ही देखील आली. भरधाव जीपने धडक दिल्याने अनेक लोक जखमी झाले. एका वृद्धाला जीपला धडक दिल्यानंतर त्याने बोनेटवर उडी मारली आणि नंतर जमिनीवर पडले. अचानक घडलेल्या घटनेने घटनास्थळी भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर सर्वांनी जखमींना बाजूला करण्याचा प्रयत्न केला.
TW: Extremely disturbing visuals from #LakhimpurKheri
The silence from the Modi govt makes them complicit. pic.twitter.com/IpbKUDm8hJ
— Congress (@INCIndia) October 4, 2021
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा बळी गेल्यामुळे देशभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. शेतकऱ्यांसह विरोधकांच्या आक्रमक भूमिकेच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांचे पुत्र आशिष यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून निवृत्त न्यायाधीशांमार्फत हिंसाचाराच्या चौकशीची घोषणा केली. मात्र, मृतांच्या कुटुंबियांना भेटण्यापासून रोखण्यात आल्याने विरोधकांनी भाजपा सरकारला लक्ष्य केले.
लखीमपूर खेरी येथे रविवारी आंदोलक शेतकऱ्यांच्या जमावात मोटारी घुसवल्याने घडलेल्या हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला. मृतांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी रविवारी रात्री काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी लखीमपूर खेरीकडे जात असताना उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना सीतापूर येथे रोखले. तेथे त्या आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये शाब्दीक चकमक झडली. अखेर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्याविरोधात प्रियांका यांनी उपोषण सुरू केले आहे.
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल, पंजाबचे मुख्यमंत्री चरणजिर्तंसग चन्नी, उपमुख्यमंत्री सुखजिंदरसिंग रंधवा, बहुजन समाज पक्षाचे एस. सी. मिश्रा आणि ‘आप’चे संजय सिंह यांना लखीमपूरला जाण्यापासून रोखण्यात आले. अखिलेख यादव यांना त्यांच्या लखनऊ येथील निवासस्थानाबाहेर पोलिसांनी रोखल्यानंतर त्यांच्या कार्यकत्र्यांनी पोलिसांचे वाहन पेटवले. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंह चन्नी यांना लखीमपूर खेरीला भेट देण्याची परवानगी उत्तर प्रदेश सरकारने नाकारली, तर पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखजिंदरसिंग रंधवा यांच्यासह काही काँग्रेस आमदारांना हरियाणा- उत्तरप्रदेश सीमेवरून उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतले.