मुंबई – लॉकडाऊनमुळे संपूर्ण जगाची आर्थिक स्थिती बिघडलेली असतानाच सोमवारी “मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0’चा शुभारंभ करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उद्योगमंत्र्यांच्या उपस्थित विविध 12 देशांतील गुंतवणूकदारांसोबत 16030 कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आला. यासंदर्भातील माहिती देणारी पोस्ट मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विटरवर टाकली. या ट्विटमधील फोटोवरून भाजपने राज्य सरकारला टोला लगावला आहे.
सीएमओच्या ट्विटर हॅण्डलवरुन पोस्ट करण्यात आलेल्या फोटोमध्ये मुख्यमंत्र्यांच्या मागील बाजूस असलेल्या बॅनरवर महाराष्ट्राचा नकाशा उलटा (मीरर इमेज) दिसत असल्याने भाजपने यावर टीका केली आहे. महाराष्ट्राचा नकाशा उलटा ‘करून दाखवला.’ याला म्हणतात महाराष्ट्रद्रोह! सगळं काही चौपट करून ठेवलं आहे आता नकाशा सुद्धा उलटा केला, असे ट्विट महाराष्ट्र भाजपाने केले आहे.
महाराष्ट्राचा नकाशा उलटा “करून दाखवला.”
याला म्हणतात महाराष्ट्रद्रोह!
सगळं काही चौपट करून ठेवलं आहे आता नकाशा सुद्धा उलटा केला.. https://t.co/g1mvdfEo6Y pic.twitter.com/81NYiXIrAr
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) June 15, 2020
तर शिवसेनेच्या समर्थकांनी या ट्विटला रिप्लाय देत व्हिडिओ कॉलदरम्यान अनेकदा मीरर इमेजमध्ये मजकूर दिसतो त्यामुळेच नकाशा उलटा दिसून नये म्हणून अशापद्धतीची रचना केल्याचा दावा केला आहे.
महाराष्ट्राचा नकाशा उलटा “करून दाखवला.”
याला म्हणतात महाराष्ट्रद्रोह!
सगळं काही चौपट करून ठेवलं आहे आता नकाशा सुद्धा उलटा केला.. https://t.co/g1mvdfEo6Y pic.twitter.com/81NYiXIrAr
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) June 15, 2020
तो कॅमेरा मध्ये काढलेला फोटो आहे, Video Conference मध्ये दिसत आहे तो बोर्ड
— Ashish Padhyar (@ashish_sena) June 15, 2020