याला म्हणतात शिस्त ! रांग मोडल्यामुळे लष्करी कमांडरची उचलबांगडी

मद्रिद – कोविड-19 लसीकरणासाठी ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचना आणि नियमांचे उल्लंघन करून करोना प्रतिबंधक लस घेतल्यामुळे स्पेनमधील वरिष्ठ लष्करी कमांडरला राजीनामा द्यावा लागला आहे. स्पेनच्या संरक्षण मंत्रालयाने शनिवारी वृत्तसंस्थेला याबाबतची माहिती दिली.

चीफ ऑफ स्टाफ जनरल मायग्युएल गेल विलारोया यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले असून संरक्षण मंत्री मार्गारिटा रोबल्स यांनी विलारोया यांचा राजीनामा स्वीकारला आहे, असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.

विलारोया यांनी नियमभंग करून करोना प्रतिबंधक लस घेतल्याबाबतचे वृत्त एका वेबसाईटवरून प्रसिद्ध झाले होते. स्पेनमधील मार्गदर्शक सूचनांनुसार स्पेनमध्ये सध्या नर्सिंग होममधील नागरिकांना आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे. विलारोया आणि अन्य वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी स्पेनमधील लसीकरण मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन केले. स्पेनमध्ये गेल्या काही आठवड्यांमध्ये लसीकरणाची रांग मोडून लस घेतली होती. त्यामध्ये ईशान्य मुरिका येथील प्रादेशिक आरोग्य प्रमुखांचाही समावेश आहे. त्या अधिकाऱ्यांनीही पदाचा राजीनामा दिला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.