मुंबई : राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार भाजपासोबत असल्याचा नितेश राणे दावा भाजइच्या एका आमदाराने केला आहे.या आमदाराच्या दाव्याने राज्याच्या राजकारणात एकच वादळ निर्माण होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी शरद पवार भाजपसोबत असल्याचा दावा केला आहे.
‘ये अंदर की बात है, शरद पवार हमारे साथ है’, असे सूचक वक्तव्य नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले. नितेश राणे यांनी यावेळी कृषी विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध नाहीच असा दावाही केला. शेती आणि शिवसेनेचा काही संबंध नाही अशी टीका यावेळी त्यांनी केली.
नितेश राणे यांनी म्हटले की, “राष्ट्रवादीचे राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी कृषी विधेयकावर मत मांडले पण विरोध केला नाही. त्यांनी फक्त सभात्या केला. ‘ये अंदर की बात है’ अशी एक घोषणा आहे त्याप्रमाणे ‘ये अंदर की बात हैं…शरद पवार हमारे साथ हैं’ इतकंच मी तुम्हाला सांगू शकतो”.
नितेश राणे यांनी यावेळी शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. कृषी विधेयकावरील भाषणं ऐकली तर संजय राऊत यांनी तळ्यात मळ्यात भाषण केले असल्याचे लक्षात येईल. शिवसेनेला नेमके कुठे जायचे आहे हेच माहिती नाही. शेती कुठे आणि कशी करायची हेदेखील त्यांच्या नेतृत्वाला माहिती नसून शेतीवर कधीही भूमिका घेत नाहीत अशी टीका नितेश राणे यांनी केली.