बंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पत्नी पार्वती यांनी १४ प्लॉट परत करण्याची तयारी दर्शवली. ती कृती गैरकृत्य केल्याची कबुलीच आहे, अशी टिप्पणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी.वाय.विजयेंद्र यांनी केली. काहीच वावगे केले नसल्याचे सिद्धरामय्या म्हणतात. आता त्यांनी प्लॉट परत करण्याचा निर्णय घेतला आहे.
कायद्याच्या कचाट्यातून वाचण्यासाठी आणि राजकीय सहानुभूती मिळवण्यासाठी त्यांनी ते पाऊल उचलले आहे. त्यांचा निर्णय म्हणजे राजकीय नौटंकी आहे. मात्र, आरोपी असणाऱ्या सिद्धरामय्या यांनी ताठर भूमिका सोडावी आणि राजीनामा द्यावा, अशी मागणी विजयेंद्र यांनी केली.