Mallikarjun Kharge | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री मुंबईतील वांद्रे पूर्व भागात तीन जणांनी गोळ्या झाडून हत्या केली. या हत्येमुळे देशात संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून एक आरोपी फरार आहे. या प्रकरणावर राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यातच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही या घटनेवर भाष्य केले आहे.
मल्लिकार्जुन खर्गे काय म्हणाले?
मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, “आम्ही उघडपणे सांगितले की महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था चांगलीनाही. जीवाला धोका असल्याचे सांगूनही पोलीस त्याला संरक्षण देऊ शकले नसतील तर हे प्रशासनाचे मोठे अपयश आहे. मुंबईसारख्या परिसरात पोलिसांनी सतर्क राहायला पाहिजे. दिवसाढवळ्या घडणाऱ्या या घटनांबाबत सरकारने चिंता व्यक्त केली नाही, या घटनांकडे दुर्लक्ष करत आहे.”
The tragic demise of Former Maharashtra Minister, Shri Baba Siddique is shocking beyond words.
In this hour of grief, I offer my deepest condolences to his family, friends and supporters.
Justice must be ensured, and the present Maharashtra Govt must order a thorough and…
— Mallikarjun Kharge (@kharge) October 12, 2024
“न्यायाची खात्री झाली पाहिजे आणि सध्याच्या महाराष्ट्र सरकारने सखोल आणि पारदर्शक तपासाचे आदेश दिले पाहिजेत. दोषींवर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे. जबाबदारी सर्वोपरि आहे. या दु:खाच्या प्रसंगी मी त्यांच्या कुटुंबियांना, मित्रांना आणि समर्थकांप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो,” असे मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले.
25-30 दिवसांपासून त्या भागात रेकी
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गेल्या 25-30 दिवसांपासून त्या भागात रेकी करत होते. तिन्ही आरोपी ऑटो रिक्षाने वांद्रे पूर्व येथे पोहोचले होते. बाबा सिद्दीकींवर हल्ला करण्यापूर्वी तिन्ही आरोपींनी तेथे काही वेळ घालवला आणि त्याची वाट पाहिली. आरोपींना इतर कोणाकडून तरी आतील माहिती मिळत असल्याचा पोलिसांना संशय आहे. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.