बँगलोर – कर्नाटकाच्या एका तरुणाने जगातील सर्वात वेगवान धावपटू उसैन बोल्टचा रेकॉर्ड तोडला आहे. कर्नाटकच्या श्रीनिवास गौडा (वय २८) असे त्या तरुणाचे नाव आहे. पारंपरिक बैलांच्या शर्यतीत तो सर्वात वेगवान धावपटू बनला आहे. तसेच बैल शर्यतीमधील विक्रमही त्याने मोडीत काढला आहे.
श्रीनिवास दक्षिण कर्नाटकातील मूदाबिदरी जिल्ह्यातमध्ये स्थायिक आहे. कम्बालाच्या बैल शर्यतीत विक्रम प्रस्थापित केल्यावर सर्वत्रच श्रीनिवासची चर्चा आहे. १०० मीटरच्या अंतर आणि वेळेनुसार श्रीनिवासचा वेग ९.५५ सेकंद आहे. याची तुलना उसैन बोल्टसोबत केली जात आहे. उसैन बोल्टच्या नावावर १०० मीटरच्या रेसमध्ये ९.५८ सेकंदच विक्रम नोंदविला गेला आहे. म्हणजेच श्रीनिवास उसैन बोल्ट ०.३ सेकंदाने वेगवान आहे. परंतु, श्रीनिवास चिखलात बैलांसोबत धावत होता. यामुळे त्याची आणि उसैन बोल्टची तुलना करता येणार नाही.
Karnataka: Srinivasa Gowda from Mudbidri, Mangaluru ran 142.5 meters in 13.62 seconds at a buffalo race (Kambala) in a paddy field on Feb1 in Kadri. He says, “People are comparing me to Usain Bolt. He is a world champion, I am only running in a slushy paddy field”. pic.twitter.com/tjq03M5m0C
— ANI (@ANI) February 15, 2020
मात्र, श्रीनिवासावर सोशल मीडियातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. तसेच नेटकऱ्यांनी श्रीनिवासला ऑलम्पिकमध्ये पाठवण्याची मागणी करत आहे. श्रीनिवासने याचे श्रेय आपल्या दोन्ही बैलांना दिले आहे.
#SrinivasGowda
If anyone needs a simple indication of how most TERRIBLY, INEFFICIENTLY #India & state #Government use it’s worlds most abundant young human resource this is 1 of the innumerable examples which has got RARE #media attention.#USAINBOLT #Kambala #race #Karnataka pic.twitter.com/uvMJT0Cgnt— Struggling Soul (@StrugglingSoul7) February 15, 2020
Electrifying Indian #USAINBOLT https://t.co/y8tN9EzAnz
— Anand Prakash (@AnandPRA) February 15, 2020
काय आहे कम्बाला?
कम्बाला शर्यत किंवा बैलांची शर्यत हा कर्नाटकचा पारंपारिक खेळ आहे. मंगलोर आणि उडुपीमध्ये हा खेळ फारच प्रचलित आहे. हा खेळ अनेक गावात आयोजित केला जातो.