हे सरकार शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळत आहे; राष्ट्रवादीचे टीकास्त्र

मुंबई: राज्याचे महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शेतकरी कर्ज घेऊन दुसऱ्या बॅंकांमध्ये फिक्स डीपॉझीट करतात, असं वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने चंद्रकांत पाटलांवर टीका केली आहे.

“शेतकऱ्यांची थट्टा करताना महसुलमंत्र्यांना लाज कशी वाटत नाही? महाराष्ट्रात बळीराजावर दुष्काळाचं सावट पसरलेल असताना हे असंवेदनशील सरकार आणि मंत्री मात्र वारंवार शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळत आहेत. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सींगद्वारे एसीमध्ये बसून दुष्काळाचा आढावा घेतला, तर दुष्काळ दौऱ्यावर असलेले मंत्री तर आपण पर्यटनासाठी फिरत असल्यसारखे वागत आहेत. आता त्यात भर म्हणून की काय, राज्याचे महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शेतकरी कर्ज घेऊन दुसऱ्या बॅंकांमध्ये फिक्स डीपॉझीट करतात, असं वक्तव्य करत शेतकऱ्यांच्या दुःखावर मीठ चोळले असल्याचे राष्ट्रवादीने म्हटले आहे.

 

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)