मुंबई – परदेशातील अनेक नायिकांनी बॉलीवूडच्या मायानगरीत प्रवेश केला खरा, मात्र त्यांना चांगल्या अभिनेत्रीपदाचा दर्जा कधीही मिळाला नाही. कारण भाषाभिन्नता. हिंदी संवादाचे प्रशिक्षण घेऊनही चित्रपटात संवादफेक करताना अनेक अडचणी येत असल्याचे श्रोत्यांच्या लक्षात येत होते.
प्रारंभीच्या काळात आकर्षणापोटी परदेशातील नायिकांना पाहण्यासाठी टॉकीजवर गर्दी होत असे. मात्र, कालांतराने ही गर्दी टिकली नाही. अशाच कारणामुळे ‘एबीसीडी २’ चित्रपटातील अभिनेत्री लॉरेन गॉटलिब चर्चेत आली आहे.
दरम्यान, लॉरेन एका मुलाखतीवेळी तिच्या करीअर आणि लाईफ मधील अप आणि डाउन शेअर केले आहे. लॉरेनने सांगितले की,’मी दारू प्यायची, शिवाय ड्रग्स देखील अतिप्रमाणात घ्यायची. मी सगळ्या गोष्टी करायची ज्या मला आनंदी ठेऊ शकतील.’ जेव्हा लॉरेन वाईट परिस्थितीत होती तेव्हा तिने पर्यायी हा मार्ग अवलंबलेला होता.
त्याचप्रमाणे ती आठ महिने सतत तिने आनंदी फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत होती. आपल्या नाराजीमध्ये आनंद शोधण्यासाठी ती मद्याचे सेवन करायची. ‘माझ्या आडचणी इतक्या वाढल्या होत्या की मी माझा चेहरा हसरा ठेवायची पण मनातून मी पूर्ण पणे खचली होती’. आपल्या वैयक्तिक जीवनातील खळबळजनक खुलासा तिने केला आहे.