नवी दिल्ली – बाॅलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे चाहते आपल्याला संपूर्ण जगात पहायला मिळतात. कोणी त्यांचे मंदिर बांधले आहे तर कोणी त्यांच्या जन्मदिवशी वृक्षारोपन करतात. अमिताभ बच्चन सुद्धा आपल्या चाहत्यांवर खूप प्रेम करतात.
आज बीग बी यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसी आपण एका अशा
चाहत्याची माहिती घेणार आहोत ज्याच्याकडे बीग बी यांचे एक दोन फोटो नाही
तर फोटोंचा खजाना आहे.
7 हजार फोटोंचा खजिना…
अमिताभ बच्चन यांचे चाहते सूरत येथील दिव्येश यांनी बीग बींच्या एकून 7 हजार फोटोंचा संग्रह केला आहे. या फोटोंमध्ये बीग बी यांचा पूर्ण जीवन प्रवास पाहायला मिळतो.
दिव्येश म्हणाले की, ‘मी अनेक वर्षांपासून बीग बी यांचे फोटो जमवत आहे. या फोटोंची संख्या 7 हजारांपेक्षाही जास्त आहे. मी त्यांची आतापर्यंत 10 वेळा भेट घेतली आहे. त्यांच्यासोबत मी फोटोही काढला आहे. तसेच त्यांच्या प्रत्येक वाढदिवशी मी 11 झाडे लावतो.’
दरम्यान, काही दिवसापूर्वी बीग बी यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. तेव्हा ते लवकर बरे व्हावेत यासाठी अनेक चाहत्यांनी प्रार्थना केली होती.