मुंबई – सध्या देशात करोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. लसीकरणाला ज्येष्ठ नागरिक आणि अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांना लस देण्यात येत आहे. लस घेतल्यानंतर सर्व राजकीय नेत्यांसह अभिनेते- अभिनेत्री सोशलवर फोटो शेअर करून लसीकरणाचं स्वागत, समर्थन करत आहे.
Dolly gets a dose of her own medicine. @VUMChealth pic.twitter.com/38kJrDzLqC
— Dolly Parton (@DollyParton) March 2, 2021
यातच अमेरिकेतील 75 वर्षीय प्रसिद्ध हॉलिवूड गायिकेने सुद्धा डॉली पार्टनने अनोख्या अंदाजात लस घेतली आहे. लस घेतांनाचा तिने एक व्हिडियो सोशलवर शेअर केला आहे. तिनं आपल्या अतिशय लोकप्रिय ‘जोलीन’ गाण्याचं कोविड व्हर्जन गुणगुणतच लस घेतली.
‘Vaccine,Vaccine,Vaccine, Vaccine, I’m begging of you please don’t hesitate. Vaccine, vaccine, vaccine, vaccine, because once you’re dead, then that’s a bit too late.” असं गुणगुणत तिनं आपल्या चाहत्यांनाही तिनं लस घेण्याचं आवाहन केलं आहे.