Offering Money For Marriage । आशियामध्ये एक असा देश आहे ज्याने लग्नासाठी जोडप्यांना 31 लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामागचे कारण म्हणजे येथे जन्मदर कमी झाला आहे.
लग्नाबद्दल समाजात अनेक प्रकारच्या समजुती आहेत. जगात दक्षिण कोरिया असाही एक देश आहे जिथे सरकार नवविवाहित जोडप्यांना 31 लाख रुपये प्रोत्साहन म्हणून देतं.दक्षिण कोरिया एका वेगळ्याच संकटातून जात आहे. या देशाला जगातल्या सर्वांत कमी जन्मदराचं संकट भेडसावत आहे. या समस्येला तोंड देण्यासाठी सरकारने नागरिकांना पैसे देण्यास सुरुवात केली आहे. सरकार नागरिकांना लग्नासाठी प्रोत्साहन देत आहे, जेणेकरून जन्मदर वाढू शकेल.
सध्या दक्षिण कोरियातला जन्मदर जगात सर्वांत कमी आहे. त्यामुळे लोकसंख्येचं संकट निर्माण झालं आहे. देशातला जन्मदर दर प्रति महिला 0.72 पर्यंत घसरला आहे. इथलं स्थानिक आणि केंद्र सरकार जन्मदर वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहेत. सरकार नवीन धोरणांद्वारे, तसंच रोख रकमेद्वारे जोडप्यांना लग्न करण्यासाठी आणि मुलं जन्माला घालण्यासाठी प्रोत्साहित करत आहे.
दक्षिण कोरियातलं सरकार लग्नासाठी पैसे देत असल्याची पोस्ट व्हायरल होताच या पोस्टवर लोकांनी खूप कमेंटही केल्या आहेत. जपानही अशाच संकटातून जात आहे. जपानमधला जन्मदर 50 वर्षांतल्या विक्रमी पातळीवर घसरला आहे. 50 वर्षांपूर्वी तिथला वार्षिक जन्मदर 50 लाख होता, तो घटून 7 लाख 60 हजारांवर आला आहे. सरकारचा अंदाज आहे, की 2035 पूर्वी त्यात वाढ होईल. सरकारने याबाबत अनेक नियम केले आहेत. आता सरकार नागरिकांना मुलं जन्माला घालण्यासाठी आणि लग्न करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे.