हा भूमिपूजन सोहळा म्हणजे, प्रत्येक रामभक्ताचा विजय

मुंबई – देशातील ऐतिहासिक राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी आता पूर्ण झाली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वतः या कार्यक्रमाच्या तयारीची पाहणी केली. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी अनेक दिग्ज मान्यवर आज अयोध्येत दाखल झाले आहेत.

दरम्यान, अयोध्येत आज होत असलेल्या राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचं औचित्य साधून ‘रामायण’ या लोकप्रिय मालिकेतील अभिनेते ‘अरूण गोविल’ यांनी सुद्धा आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. नव्वदच्या दशकात रामायण मालिकेची अफाट लोकप्रियता होती. या मालिकेत अरूण गोविल यांनी प्रभू रामाची भूमिका साकारली होती. जही त्यांच्या लोकप्रियतेत तसूभरही फरक पडलेला नाही.

अरूण गोविल यांनी ट्विट करत राम मंदिर निर्माणाच्या काही तास अगोदर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “अयोध्येत राम मंदिर व्हावं म्हणून अनेक वर्षांपासून संघर्ष करणाऱ्या तसंच ह्या संघर्षाच्या लढाईला भूमीपूजन सोहळ्यापर्यंत आणणाऱ्या प्रत्येक रामभक्ताचा हा विजय आहे. त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम”. असं अरूण गोविल म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.