‘ही’ अभिनेत्री लवकरच करणार बॉलिवूडमध्ये

बॉलिवूडपासून ते टेलिव्हिजनच्या दुनियेत यशस्वीपणे कारर्किद घडविणारी सर्वाधिक फिट असलेल्या अभिनेत्रीपैकी एक असलेल्या शिल्पा शेट्टी. तिने स्वतःला मेन्टेन करण्यासाठी जीम एक्‍सरसाईजबरोबर योगाभ्यासही सातत्याने केला आहे. त्यासाठी तिला सेलिब्रिटी फिटनेस गुरु म्हटलेही जाते.


तिने सोशल मिडीयावर आपले वर्कआऊटचे व्हिडीओ अपलोड केले आहेत. मात्र असे असताना देखील शिल्पा गेल्या कित्येक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे.मिळालेल्या माहितीनुसार, शिल्पा लवकरच रमेश तौराणी प्रोडक्शनच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे. तसेच या चित्रपटात दिलजित आणि यामी यांनी होकार दिला आहे. त्यामुळे एक फ्रेश जोडी प्रेक्षकांना चित्रपटात पाहायला मिळणार आहे.


हा चित्रपट एक कॉमेडी चित्रपट असून एका जोडप्याची कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. यापूर्वी २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या लाईफ इन मेट्रो आणि अपने चित्रपटानंतर ती कोणत्याच चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकली नव्हती. त्यामुळे रमेश तौराणी प्रोडक्शनच्या आगामी चित्रपटाच्या माध्यमातून शिल्पा शेती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)