सैराट चित्रपटात प्रदीप म्हणजेच ‘लंगड्या’ची भूमिका साकारणारा बेंबळे (ता.माढा) येथील अभिनेता तानाजी गळगुंडे याची भूमिका प्रेक्षकांना नेमहीच लक्षात राहणारी आहे .विनोदी स्वभावाचा आणि परश्याला सतत मदत करणारा.सैराटच्या इतर कलाकारांसारखीच त्याची निवड झाली.
कॉलेजमध्ये शिकत असताना तानाजीचं नाव त्याच्या सरांनी नागराज मंजुळे यांना सुचवलं. त्याने मग ऑडीशन्स दिल्या आणि त्याची निवड केली गेली.
त्यानेही ती सार्थ ठरवली. अभिनयाचं कुठचही शिक्षण न घेता, स्वयंस्फूर्तीने जसं नागराजजी सांगत गेले, तसं तो काम करत गेला. त्याचं पात्र मुख्य पात्रांसारखं खूप गाजलं.
पुढे त्याने सैराट च्या दक्षिणेकडच्या रिमेकमध्ये म्हणजे “मनसु मल्लिगे’ मध्येही त्याने दमदार काम केलं. सैराटच्या यशानंतर तो ‘द कपिल शर्मा शो’, ‘ड्रामा कंपनी’, ‘कॉमेडीची जी.एस.टी. एक्स्प्रेस’, ‘सा रे गा मा पा’ यांसारख्या रियालिटी शोजमधून दिसला.
कॉमेडीची जी.एस.टी. एक्स्प्रेस, ड्रामा कंपनी मध्ये स्कीट्सही त्याने केले होतं. पण केवळ टी.व्ही. पुरत तो मर्यादित राहिला नाही. त्याने “माझा अगडबम” या सिनेमात तृप्ती भोईर आणि सुबोध भावे यांच्या सोबतही काम केलं आहे. तसचं, गेल्या डिसेंबरमध्ये “मनी मनी” या सुमित म्युजिकच्या एका गाण्यावर थिरकताना तानाजी आपल्याला दिसला होता.