बॉलीवूडमधील तारे-तारखा नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी मुंबईबाहेर जाण्याला प्राधान्य देतात. यातील अनेकांची पावले गोव्याकडे वळताना दिसतात. बी-टाऊनची हॉट ऍक्ट्रेस मलायका अरोराही यंदा थर्टी फर्स्टसाठी गोव्याला गेली होती. मलायकाने आपली बहीण अमृता आणि तिचा पती शकील यांच्यासह अन्य काही मित्रांबरोबर नववर्ष स्वागताचा जल्लोष अनुभवला.
View this post on Instagram
#Repost @manekaharisinghani with @get_repost ・・・ @malaikaaroraofficial ?? @nicolasjebranworld
यादरम्यान गोव्यातील पार्टीची अनेक छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरस झाली आहेत. या फोटोंमध्ये मलायका-अमृता या भगिनी खूप दंगामस्ती करताना दिसत आहेत. मलायकानेही यातील काही फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकौंटवर शेअर केले आहेत. या फोटोंना “गोवा टाईम्स’ असे कॅप्शन मलायकाने दिले आहे. फोटोंमध्ये मलायका नेहमीप्रमाणेच हॉट आणि स्टायलिश दिसत आहे. पण हे फोटो किंवा मलायका त्यामुळे चर्चेत आलेले नाहीत.
चर्चेचे कारण आहे या फोटोत मिसिंग असलेली एक व्यक्ती. ती म्हणजे अर्जुन कपूर. मलायकाचा जीवश्चकंठश्च बॉयफ्रेंड असणारा अर्जुन अशा सेलीब्रेशनच्या वेळी सोबत नसणे याबाबत अनेक शंका व्यक्त होत आहे. कारण हे दोघे विवाह करणार असल्याचीही चर्चा होती. असे असताना ईअरएंड पार्टीतील त्याची अनुपस्थिती चर्चेला निमित्त देऊन गेली आहे.