पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात एकाच दिवशी 30 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. शहरात आज 807 नवीन रुग्णांची भर पडली. आतापर्यंत शहरात 36,863 जणांना करोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत 819 जणांचा मृत्यू झाला आहे.
मंगळवारी चार वाजेपर्यंत शहरात 807 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. शहरातील 785 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर शहराबाहेरील 22 जणांना करोनाची लागण झाली. आतापर्यंत शहरातील एकूण रुग्णांची संख्या 36,863 इतकी झाली आहे. शहरातील महापालिकेचे रुग्णालय व कोविड केअर सेंटरमध्ये करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
सद्यस्थितीत शहरात 6296 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यामध्ये शहराबाहेरील 490 रुग्णांचाही समावेश आहे. सोमवारी दिवसभरात शहरातील 30 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला. त्यामध्ये शहरातील 23 व शहराबाहेरील 7 रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात 198 रुग्णांना घऱी सोडण्यात आले.