तीस हजार महिलांकडून छोट्या उद्योगांची श्रीगणेशा 

नवी दिल्ली: पंतप्रधान रोजगारनिर्मिती कार्यक्रम म्हणजे पीएमईजीपी अंतर्गत देशात 30 हजारांपेक्षा जास्त महिलांनी छोटे उद्योग सुरू केले असल्याचा दावा सरकारने केला आहे. लघुउद्योग मंत्री गिरीराज किशोर यांनी लोकसभेत प्रश्‍नोत्तराच्या तासांत सांगितले, की 2016-17 व 2017-18या वर्षात या योजनेच्या अंतर्गत 30437 इतक्‍या महिलांनी 853 कोटी रुपयाच्या भांडवलाचा वापर करून आपले छोटे उद्योग सुरू केले आहेत. 
या योजनेचा सर्वात अधिक लाभ महाराष्ट्रासह तमिळनाडू, उत्तर प्रदेश, आसाम, बिहार, ओडिशा, गुजरात या राज्यातील महिलांनी घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. या योजनेनुसार शहरातील महिलांना 25 टक्‍के तर खेड्यातील महिलांना 35 टक्‍के अनुदान दिले जाते. मॅन्युफॅक्‍चरिंग क्षेत्रातील उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत तर सेवा क्षेत्रातील उद्योगांसाठी 10 लाखापर्यंचे कर्ज दिले जाते. या योजनेची देशातील महिलांना माहिती व्हावी, त्याचे शंका समाधान व्हावे याकरिता सरकारने उद्यम सखी पोर्टल सुरू केले आहे. त्याला देशातील महिलांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा त्यांनी केला. यासाठी महिलांना योग्य कौशल्य आणि बाजारपेठ उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला जातो असे त्यांनी सांगितले. आगामी काळातही महिलांना प्रोत्साहन देण्यात येईल. 
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)