कोरोना-सारी संसर्गजन्य आजाराने कोपरगावमध्ये तिसरा बळी…

कोपरगाव (प्रतिनिधी) : गेल्या दोन महिन्यांपासून देशासह राज्यात करोना संसर्गजन्य आजराने कहर केला आहे. विविध ठिकाणी हजारो रुग्ण करोना बाधितांचा मृत्यच होत आहे. त्यातच कोपरगाव मध्ये शहरातील लक्ष्मी नगर भागातील एका महिलेचा तर शिंगणापूर येथील एका महिलेचा करोना बाधीत सारी सदृश्य आजाराने काही दिवसापुर्वी मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना शुक्रवार २२मे रोजी सकाळी दहाच्या दरम्यान कोपरगाव तालुक्यातील मनाई वस्ती संवत्सर येथील एका २२ वर्षीय विवाहित महिलेला करोना – सारी सारख्या संसर्गजन्य आजाराचे लक्षणे असलेल्या आजाराने उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने संपूर्ण आरोग्य यंत्रणेसह तालुक्यात खळबळ उडाली आहे.तालुक्यात संसर्ग जन्य आजाराचा हा तिसरा बळी गेला आहे.

याबाबत कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिलेली अधिक माहिती अशी की, तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीतील मनाई वस्ती येथे रहाणाऱ्या एक 22 वर्षीय विवाहित महिलेला घसा, छातीत सर्दी खोकला होवुन कफ झाल्याने दम लागत होता. या त्रासाने व्याकुळ झालेल्या महीलेला  शुक्रवार दि 22 मे रोजी सकाळी दहाच्या दरम्यान ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता ग्रामीण रुग्णालयाचे डॉ विजय गणगोटे यांनी प्राथमिक तपासणी करून तातडीने उपचार सुरू केले.

कोपरगाव तालुक्यातील मनाई वस्ती संवत्सर येथील एका २२ वर्षीय विवाहित महिलेला करोना – सारी सारख्या संसर्गजन्य आजाराचे…

Posted by Digital Prabhat on Friday, 22 May 2020

महिलेची शाररीक परिस्थिती नाजूक होत चालल्याने पुढील उपचारासाठी दाखल करण्याची तयारी करीत असताना सदर महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने कोपरगाव ग्रामीण रुग्णालयातील यंत्रणा गडबडून गेली. डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी मयत महिलेची अधिक माहीती घेत दिसणाऱ्या लक्षणावरुन या महीलेचा मृत्यु करोना सदृश्य सारी संसर्गजन्य आजराने झाला असल्याचा संशय व्यक्त करीत मयत महिलेच्या घशाचे स्राव पुढील तपासणीसाठी अहमदनगर येथे पाठविण्यात आले आहे.

दरम्यान मयत महिलेचा मृत्यू संसर्गजन्य आजराने झाल्याचा अंदाज आरोग्य यंत्रणेने व्यक्त होताच महिलेचा मृतदेह सुरक्षित बंदिस्त करून संपूर्ण ग्रामीण रुग्णालय परिसर तातडीने निर्जंतुकीकरण केले. खबरदारीचा उपाय योजना राबविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली.

मयत महिलेच्या नातेवाईकाकडून सविस्तर माहिती घेतली असता तिचे दोन वर्षापूर्वी येवला तालुक्यातील सायगाव येथे लग्न झाले असून तिला दीड वर्षाची मुलगी ती गेल्या दोन महिन्यांपासून श्वासोच्छ्वास व घसा छाती मध्ये त्रास होत असल्याने आजारी होती.उपचारासाठी माहेरी मनाई येथे अली होती. दरम्यान संवत्सर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तिने तपासणी केली असता तीला क्षयरोगाचे लक्षणे असल्याचे निष्पन्न झाले. तिच्यावर संवत्सर ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी उपचार सुरू केले होते. प्रकृतीमध्ये विशेष फरक पडत नसल्याने शिंगणापुर परिसरातील सहकार महर्षी कोल्हे कारखाना येथील एका खाजगी डॉक्टर कडे तिने उपचार घेतला होता.

लॉकडाऊनच्या काळात कुठे बाहेर जाता येत नसल्याने जवळचे संपलेले होते. औषध वेळेत न मिळाल्याने सादर महिलेची प्रकृती अधिक बिघडली.शुक्रवारी तिच्या वडिलांनी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढीँ उपचारासाठी पुढे पाठविण्याच्या तयारीत असताना तिचा मृत्यू झाला. या महिलेच्या मृत्यूने कोपरगाव तालुक्यात करोना – सारी सदृश्य आजाराने तिसरा बळी गेल्याने खळबळ उडाली आहे. बाधीत मयत झालेल्या तिन्ही महीलाच आहेत मात्र या महीलेचे वय केवळ २२ वर्ष आहे.

संसर्गजन्य आजाराने महिलेचा मृत्यू झाल्या नंतर प्रशासकीय यंत्रणेने मयत महिला राहत असलेला मनाई परिसर सील करण्यात आला आहे अशी माहीती डॉ. फुलसौंदर यांनी दिली. पुढील आरोग्य यंत्रणा सतर्क ठेवण्यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाटे, डॉ.विजय गणबोटे व त्यांचे सहकारी प्रयत्न करीत आहेत.

कोपरगाकरांनो करोना व सारी संसर्गजन्य आजार कोपरगाव तालुक्यातुन गेला नाही तो आजून आहे. तेव्हा सावध रहा. बाजारपेठ खुली झाली, रहदारी सुरू झाली व्यवहार गतिमान झाले कोरोना गेला म्हणून तुम्ही गाफिल राहू नका तो अदृश्य बॉम्ब आहे .तो कुठे ही कधी ही कोणाकडे ही फुटू शकतो तेंव्हा सुरक्षित राहा गर्दी करू नका, गर्दीत जाऊ नका.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.