चंदिगड – नार्को टेरर प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्था अर्थात “‘एनआयएने दोघांजणांच्या विरोधात मोहालीतील विशेष न्यायालयात तिसरे पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. या दोघांमध्ये एक जण पाकिस्तानी नागरिक आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
हे नार्को टेरर प्रकरण दहशतवादी संघटना हिज्बुल मुजाहिदीनशी संबंधित आहे. याप्रकरणी अमृतसरमधील गुरजंत सिंग आणि पाकिस्तानातील नासिर या दोघांवर भारतीय दंडसंहिता, अंमलीपदार्थ विरोधी कायदा आणि बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांखाली आरोप दाखल करण्यात आले आहेत.
यावर्षी एप्रिलमध्ये अमृतसरमध्ये अल्लाह अहमद शेरगोजरी याच्या ट्रकमधून 29 लाख रुपयांचे अंमलीपदार्थ जप्त करण्यात आले होते. तपासादरम्यान तो हिज्बुल मुजाहिदीनचा तत्कालीन कमांडर रियाझ अहमद नायकू याचा सहकारी असल्याचे उघड झाले होते. त्यानंतर या प्रकरणाचा तपास “एनआयए’ने हाती घेतला आहे.