तिसरी पीएमडीटीए केपीआयटी कुमार चॅम्पियनशिप सिरिज टेनिस स्पर्धा
पुणे – श्रावणी देशमुख, समृध्दी भोसले, तेज ओक व अदनान लोखंडवाला यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत येथे पार पडलेल्या पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे व केपीआयटी यांच्या संलग्नतेने 12 व 14 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील तिसऱ्या पीएमडीटीए केपीआयटी कुमार चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
सेंटर फॉर पोलिस रिसर्च (सीपीआर), पाषाण येथील टेनिस कोर्टवर पार पडलेल्या या स्पर्धेत विजेतेपदासाठीच्या लढतीत 14 वर्षाखालील मुलांच्या गटात अंतिम फेरीच्या संघर्षपुर्ण लढतीत तिसऱ्या मानांकित अदनान लोखंवाला याने अव्वल मानांकित जय पवारचा 5-4(7-4), 4-2 असा टायब्रेक मध्ये पराभव करून या गटाचे विजेतेपद पटकावले.
14 वर्षाखालील मुलींच्या गटात अंतिम फेरीच्या सामन्यात नांदेडच्या दुसऱ्या मानांकित समृद्धी भोसले हिने सहाव्या मानांकित पुण्याच्या देवांशी प्रभुदेसाईचा टायब्रेकमध्ये 4-2, 5-4(7-4) असा पराभव करून या गटाचे विजेतेपद पटकावले. समृद्धी ही पार्थ चिवटे टेनिस अकादमी येथे प्रशिक्षक पार्थ चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.
12 वर्षाखालील मुलांच्या गटात अंतिम फेरीत बिगर मानांकीत तेज ओकने दुस-या मानांकीत अभिराम निलाखे याचा 4-2, 4-2 असा एकतर्फी पराभव करून विजेतेपद पटकावले.
12 वर्षाखालील मुलींच्या गटात अंतिम फेरीत पुण्याच्या श्रावणी देशमुख हिने आपलीच सहकारी प्रिशा शिंदेचा 4-0, 4-1 असा सहज पराभव करून या गटाचे विजेतेपद पटकावले.श्रावणी ही सिंहगड स्प्रिंग डेल पब्लिक स्कुलमध्ये आठवी इयत्तेत शिकत असून महाराष्ट्रीय मंडळ येथे प्रशिक्षक धारणीधार मिश्रा व राजेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. या वर्षातील या गटातील तिचे हे चौथे विजेतेपद आहे. मुलांच्या गटात बिगरमानांकित तेज ओक याने दुसऱ्या मानांकित अभिराम निलाखेचा असा पराभव करून या गटाचे विजेतेपद पटकावले. स्पर्धेतील विजेत्यांना करंडक व प्रशस्तीपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली.
सविस्तर निकाल :
14 वर्षाखालील मुले : उपांत्य फेरी: जय पवार(1) वि.वि अभिराम निलाखे 7-6(4), अदनान लोखंडवाला(3) वि.वि अनिश रांजळकर (2) 7-4
अंतिम फेरी – अदनान लोखंडवाला(3) वि.वि जय पवार(1) 5-4(7-4), 4-2;
14 वर्षाखालील मुली : उपांत्य फेरी : देवांशी प्रभुदासाई(6) वि.वि श्रावणी देशमुख 7-5, समृध्दी भोसले(2) वि.वि रिया अरोरा 7-1;
अंतिम फेरी – समृध्दी भोसले(2) वि.वि देवांशी प्रभुदासाई(6) 4-2, 5-4(7-4);
12 वर्षाखालील मुले : उपांत्य फेरी : तेज ओक वि.वि अमन शहा 7-2; अभिराम निलाखे(2) वि.वि अव्दिक नाटेकर(3) 7-6(7-4);
अंतिम फेरी – तेज ओक वि.वि अभिराम निलाखे(2) 4-2, 4-2,
12 वर्षाखालील मुली: उपांत्य फेरी: प्रिशा शिंदे वि.वि आहना अत्तवार(1) 7-3, श्रावणी देशमुख वि.वि देवांशी प्रभुदासाई 7-3;
अंतिम फेरी – श्रावणी देशमुख वि.वि प्रिशा शिंदे 4-0, 4-1.