लंडन – इंग्लिश प्रीमिअर लीग व रशियन लीगसह युरोपातील अन्य फुटबॉल स्पर्धा त्रयस्थ ठिकाणी घेण्यात याव्यात, अशी मागणी इंग्लंड व रशियातील पोलीस यंत्रणेने केली आहे.
करोनाचा धोका अद्याप कायम असल्याने लोकांचा जीव धोक्यात घालून स्पर्धा खेळविण्यापेक्षा ज्या संघाचे घरचे मैदान प्रेक्षकांनी फुलून जाते तिथेच हा धोका वाढेल त्यामुळे प्रत्येक संघाला “होम’ सामन्यांच्या जागी “अवे’ सामने खेळविण्याची सूचना करावी, अशी मागणीही पोलिसांनी केली आहे.
प्रीमिअर लीगला 17 जूनपासून सुरुवात होत असून त्यासाठी काही मैदाने निश्चित करण्यात यावीत तसेच या सामन्यांना मर्यादित प्रेक्षकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी आयोजकांनी केली आहे.