झारखंडमध्ये तिसऱ्या टप्प्यातील मतदान शांततापूर्वक

झारखंड विधासभेच्या तिसरा टप्प्यातील मतदान शांततापूर्वक पार पडले. गुरुवारी १७ जागेसाठी मतदान झाले. ६२.३ टक्के जनतेने आपल्या मताधिकारचा वापर केला. निवडणूक अधिकाऱ्याने दिलेल्या माहिती नुसार सिल्लीत सर्वाधिक ७६.९८ टक्के मतदान झाले. तर सर्वाधिक कमी मतदान ४९.१ मतदान राजधानी रांचीत नोंदवलं.

या अतिरिक्त कोडरमा 58.20, बरकट्ठा 61.18, बरही 63.40, बड़कागांव 64.53 टक्के, रामगढ़ 70.05, हजारीबाग 57.18, सिमरिया 62, राजधनवार 59.86, गोमिया 67.18, बेरमो 61.13, ईचागढ़ 73.11, खिजरी 63.09, हटिया 53.63, कांके 62.83 तर मांडू विधानसभेत 62.41 मतदारांनी उमेदवारांच भविष्य मतपेटीत बंद केलं.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.