थर्ड आय क्रिकेट दिवेकर अकादमी संघाची विजयी सलामी

पुणे – थर्ड आय स्पोर्टस अँड इव्हेंट्‌स एलएलपी यांच्या वतीने आयोजित जेझेड थर्ड आय करंडक 12 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत ओमकार रसाळ (2-7) याने केलेल्या शिस्तबद्ध गोलंदाजीच्या जोरावर दिवेकर क्रिकेट अकादमी संघाने पीवायसी हिंदू जिमखाना अ संघाचा 4 धावांनी पराभव करून आजचा उदघाटनाचा दिवस गाजवला.

या स्पर्धेत साखळी फेरीत प्रथम फलंदाजी करताना दिवेकर क्रिकेट अकादमी संघाने 25 षटकात 8 बाद 126 धावा केल्या. यात ईश्‍वर अवसरे 44, आर्यन जाधव 13, महक मुल्ला 10 यांनी धावा काढून संघाच्या डावाला आकार दिला. पीवायसीकडून हर्षल पासलकर (3-18), अर्जुन चेपे (3-23), आदीत डोंगरे (2-13) यांनी सुरेख गोलंदाजी केली.

पीवायसी हिंदू जिमखाना अ संघाचा डाव 24.3 षटकात 122 धावावर संपुष्टात आला. यामध्ये सचल सिंगने (37) दिलेली लढत अपुरी ठरली. दिवेकर क्रिकेट अकादमीकडून आदित्य कापरे (3-36), ओमकार रसाळ (2-7), क्षितीज पाटील (2-26) यांनी अचुक गोलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. सामन्याचा मानकरी ओमकार रसाळ ठरला. स्पर्धेचे उदघाटन जेझेड लेक व्ह्यू फाईन डाईन रेस्ट्रो अँड बॅंक्वेस्टचे (मानस लेक भुगाव) मालक अतुल इंगवले आणि मंदार भालेराव यांच्या हस्ते करण्यात आले.

संक्षिप्त धावफलक –

दिवेकर क्रिकेट अकादमी – 25 षटकात 8 बाद 126 धावा. (ईश्‍वर अवसरे 44, आर्यन जाधव 13, महक मुल्ला 10, हर्षल पासलकर 3-18, अर्जुन चेपे 3-23, आदीत डोंगरे 2-13) वि. वि. पीवायसी हिंदू जिमखाना अ – 24.3 षटकात सर्वबाद 122 धावा. (सचल सिंग 37, शौनक राजे 15, शौनक टेंबुरणीकर 18, आदित्य कापरे 3-36, ओमकार रसाळ 2-7, क्षितीज पाटील 2-26, आर्यन यादव 1-17). सामनावीर – ओमकार रसाळ.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.