जामखेड (प्रतिनिधी) – करमाळा तालुक्यातील चिखलठाण येथे बिबट्याच्या हल्ल्यात ऊसतोडणी मजूराच्या आठ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. बिबट्याला गोळ्या घालण्यासाठी शार्पशूटरही दाखल झाले आहेत. बिबट्याला ठार मारण्यासाठी वनविभागाने आदेश दिले होते. त्यानंतर त्या ठिकाणी शार्पशूटर दाखल झाले आहेत. परंतु, शार्पशूटर गावात दाखल होण्यापूर्वीच बिबट्यानं आठ वर्षीय मुलीचा जीव घेतला आहे.
पुणे जिल्हा: बिबट्या करतोय दुचाकींचा पाठलाग
बिबट्या आज पहाटे गावात आल्याचं गावकऱ्यांना समजलं होतं. चिखलठाण या गावातील माजी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षांच्या शेतात ऊस तोडणीचं काम सुरु होतं. त्यावेळी नंदुरबार जिल्ह्य़ातील दुसाने येथून आई-वडीलांसोबत आलेल्या फुलाबाई आरचंद कोटली ही आठ वर्षांची मुलगी शेतात बाजूला खेळत होती. त्याचवेळी बिबट्यानं संधी साधत आठ वर्षांच्या चिमुरडीवर हल्ला केला.
करमाळा : बिबट्याने केलेल्या हल्ल्यात महीलेचे शीर धडापासून वेगळे
बिबट्या आल्याचं पाहून गावकरी त्याला मारण्यासाठी धावत आले. लोकांचा जमाव पाहून बिबट्यानं तिथून पळ काढला. यासंदर्भात माहिती वनविभागाला दिल्यानंतर, वनविभागाचं पथक गावात दाखल झाले आहे.
“मंत्री साहेब, रात्रीतरी पूर्ण दाबाने वीज द्या” – बिबट्याच्या वावराने भयभीत शेतकऱ्यांची मागणी
गावकऱ्यांना तिथून बाजूला करून वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. वनविभागाची जवळपास 100 कर्मचाऱ्यांचं पथक करमाळ्यातील या गावात दाखल झालं आहे. या पथकामध्ये शार्पशूटरही आहेत.
बिबट्यानं चिमुरडीवर हल्ला केल्यानंतर तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला होता. या नरभक्षक बिबट्यानं गेल्या चार दिवसांत तीन बळी घेतले आहेत. त्यामुळे बिबट्याला जेरबंद करण्याचं आव्हान आता वन विभागासमोर उभं ठाकलं आहे. तसेच, बिबट्याच्या दहशतीमुळे आजूबाजूच्या परिसरात भीतीचं वातावरणं पसरलं आहे.