‘रो’ हिट… तिसऱ्यांदा झळकावलं शतक

रांची : सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेत ‘हिटमॅन’ रोहित शर्माने तिसरे शतक झळकावले आहे. रांची मध्ये आज सुरु झालेल्या पहिल्याच डावात रोहितने शतक ठोकत आपली निवड सार्थ ठरवली आहे. रोहितचा हे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सध्या सुरू असलेल्या मालिकेतील तिसरं तर, कारकिर्दीतील सहावं कसोटी शतक आहे.

दरम्यान सलामीवीर मयाकं अग्रवाल अवघ्या १० धावा करून तंबूत परतला. त्यानंतर आलेला चेतेश्वर पुजारा शून्यावर बाद झाला. तर, कर्णधार विराट कोहलीही १२ धावा करून परतला.

त्यामुळे भारताची अवस्था ३ बाद ३९ अशी झाली होती. एका बाजूला संघाची अशी पडझड होत असताना रोहितनं किल्ला लढवत शतक साकारल आहे. रोहितने १३० चेंडूंमध्ये हे शतक केल आहे. त्यात चार षटकार आणि १३ चौकारांचा समावेश होता.

अजिंक्य रहाणेनं त्याला उत्तम साथ दिली. रोहित आणि रहाणेच्या भागीदारीच्या जोरावर भारतानं २०० धावांचा टप्पा ओलांडला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.