शिक्षक सोसायटीत आता दोघांत तिसरा

नगर – जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी सोसायटीच्या 21 जागांसाठी 64 जण निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. यामध्ये सर्वसाधारण मतदारसंघात उमेदवारांची भाऊगर्दी झालेली आहे. ही निवडणुकीत दुरंगी ऐवजी आता तिरंगी होत आहे. त्यामुळे दोघांत तिसरा पॅनल तयार झाला आहे.

माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या संचालकपदाच्या 21 जागांसाठी 340 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यांतील 17 अर्ज छाननीत बाद झाले. आजअखेर 234 जणांनी अर्ज मागे घेतल्याने 89 उमेदवार आखाड्यात राहिलेले होते. त्यातील काहीजणांचे दोन दोन अर्ज असल्याने आज उमेदवारी यादी अंतिम करण्यात आली. आता एकूण 64 जण निवडणुकीच्या आखाड्यात राहिलेले आहेत. ही निवडणूक परिवर्तन पॅनल व पुरोगामी सहकारमध्ये होईल, असा सर्वांचा अंदाज होता. मात्र जनसेवा बहुजन विकासने आपले उमेदवार करून निवडणुकीत चुरस वाढविलेली आहे.

निवडणुकीच्या आखाड्यातील काही प्रमुख उमेदवारः ज्ञानदेव अकोलकर, मुकुंद अंचवले, भाऊसाहेब कचरे, विनायक कचरे, शशिकांत काकडे, दिलीप काटे, ज्ञानेश्‍वर काळे, संजय कोळसे, चांगदेव खेमनर, राजेंद्र गवांदे, अनिल गायकर, उमेश गुंजाळ, उध्दव गुंड, काकासाहेब घुले, चंद्रकांत चौगुले, बाळासाहेब जाधव, राजेंद्र जंगले, शिरीष टेकाडे, अशोक ठुबे, सूर्यकांत डावखर, दिलीप डोंगरे, अण्णासाहेब ढगे, बाळासाहेब तांबे, भिमाशंकर तोरमल, सत्यवान थोरे, सुनील दानवे, नंदकुमार दिघे, अरविंद देशमुख, भाऊसाहेब पगारे, सुनिता पटेकर, बाबासाहेब पवार, बाबासाहेब बोडखे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.