मुंबई – लोकसभा निवडणुकांचा सातव्या आणि अंतिम टप्प्यातील प्रचार कालच सायंकाळी थंडावला असून प्रचाराच्या धामधुमीनंतर लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज केदारनाथ येथे पूजाअर्चेसाठी आले आहेत. आज सकाळी 9 ते 9:30च्या सुमारास मोदी केदारनाथ येथे हेलिकॉप्टरद्वारे पोहोचले असून आज ते येथील एका गुहेमध्ये ध्यानधारणेसाठी बसले आहेत.
दरम्यान, मोदींच्या आजच्या केदारनाथ दौऱ्यावरून विरोधक त्यांच्यावर चांगलाच निशाणा साधत असून राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते जयंत पाटील यांनी देखील मोदींच्या ध्यानधारणेवरून त्यांना लक्ष्य केलं आहे. याबाबत जयंत पाटील यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्याद्वारे एक ट्विट शेअर केलं असून ते लिहतात, “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रसिद्धीसाठी काहीही करू शकतात. आशा आहे की मोदी आपल्या ध्यानस्थ अवस्थेत काल पत्रकारांच्या प्रश्नांना न दिलेल्या उत्तरांबाबत विचार करतील व भविष्यात आणखीन एखादी पत्रकार परिषद घेण्याचा विचार करतील.”
Meditating with Media?
.@narendramodi can do anything for publicity.
Hope the Prime Minister is thinking about all the unanswered questions in the press conference or maybe the next one hopefully.#Kedarnath #MuteModi pic.twitter.com/0Vo5J7gwwN— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) May 18, 2019