पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट; भरदिवसा घराचे कुलूप तोडून 2.30 लाखांचा ऐवज लांबविला

पुणे –  भरदिवसा सदनिकेचे कुलुप तोडून चोरट्यांनी कपाटातील रोकड आणि दागिने असा दोन लाख ३० हजारांचा ऐवज लांबविल्याची घटना हडपसरजवळील रामटेकडी परिसरात घडली.

याबाबत एका महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला गुरूवारी सायंकाळी पाचच्या सुमारास सदनिका बंद करून बाहेर पडली. खरेदी करून ती तासाभरानंतर घरी परतली. तेव्हा सदनिकेचे कुलुप तोडल्याचे निदर्शनास आले. चोरट्यांनी कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोकड असा ऐवज लांबविला. पोलीस उपनिरीक्षक जयवंत जाधव तपास करत आहेत.

दरम्यान, शनिपाराजवळ महिलेच्या हातातील एक लाखांची बांगडी चोरट्याने लांबविल्याची घटना बाजीराव रस्त्यावरील शनिपार मंदिराजवळ घडली आहे.

याबाबत एका महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला सिंहगड रस्ता भागात राहायला आहे. दहा दिवसांपूर्वी त्या शनिपार परिसरात आल्या होत्या. त्यांनी एका औषध विक्री दुकानासमोर दुचाकी लावली होती. काम आटोपून त्या पुन्हा दुचाकीजवळ आल्या.  दुचाकीशेजारी दुसरी दुचाकी लावण्यात आली होती. त्यांना दुचाकी काढताना अडचण आली. त्या वेळी एक चोरटा तेथे घुटमळत होता. चोरट्याने तक्रारदार महिलेला मदत करण्याचा बहाणा केला. दुचाकी काढून देण्याचा बहाणा करून त्याने महिलेच्या नकळत हातातील एक लाख पाच हजारांची सोन्याची बांगडी लांबविली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.